शेतकरी प्रमाणे मच्छीमारी करणारा सभासदांना मानधन देण्यात यावे – दत्ताभाऊ गुणवंत यांची मागणी

बीड तालुक्यातील बिंदुसरा तलाव परिसरातील मच्छीमारी करणाऱ्या सभासदांना अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे. पावसाच्या तडाख्यामुळे मच्छी बीज संचन व जाळी वाहून गेल्याने मच्छीमारांवर उपासमार्‍याची वेळ आली आहे.

या पार्श्वभूमीवर बीड भोई समाज व मच्छीमारी कृती समितीच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात मच्छीमारी करणाऱ्या सभासदांना शेतकऱ्यांप्रमाणेच मानधन मिळावे, म्हणजेच वर्षाला सहा हजार रुपये देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली.

मच्छीमारी सभासदाचे जाळे वाहून गेल्यामुळे मच्छीमारी करणाऱ्या संकट व उपासमार्‍याची वेळ आली आहे.

 दादांनी शब्द दिला की केंद्र सरकार कडे शिफारस करून शेतकरी प्रमाणे मच्छीमाऱ्याला वर्षाचे सहा हजार रुपये कसे भेटतील ते प्रयत्न करीन अशी अजित दादांनी गवई दिली मच्छीमारेला न्याय देण्यात प्रयत्न करीन दादांनी केंद्र सरकारला शिफारस करून शेतकरी प्रमाणे मच्छीमारी करणाऱ्या सभासदांना वर्षाला सहा हजार रुपये मानधन कसे मिळेल हे आमलबजाणी करण्यात येईल

दत्ताभाऊ गुणवंत, अध्यक्ष – बीड भोई समाज यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारी करणाऱ्या सभासदांनाही दरवर्षी मानधन मिळाले पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत तातडीने मदत मिळावी, जेणेकरून मच्छीमारांचे संकट काही प्रमाणात हलके होईल.” मत्स्य व्यवसाय हा ग्रामीण भागातील मच्छीमार, शेतकरी व बेरोजगारांसाठी महत्त्वाचा आधार असून, या नुकसानीमुळे त्यांच्या उदरनिर्वाहावर मोठे संकट ओढावले आहे.

स्थानिक पातळीवरून शासनाने तात्काळ नुकसान भरपाई व मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी होत आहे

 निवेदन देताना बीड भोई समाज अध्यक्ष बीड दत्ताभाऊ गुणवंत मच्छीमारी अध्यक्ष अशोक लुचारे संतोष काजळे किशोर पाबळे वैद्य सर मनोज खरमुडे सर श्रीराम धुले याच्या सह

Jalna Express Media  के बारे में
For Feedback - softisky@gmail.com