मराठवाड्याचा मान उंचावला – डॉ. अनिकेत कुलकर्णी यांची सीएसइपीआय राष्ट्रीय कार्यकारिणीत निवड

बीडचे डॉ. अनिकेत कुलकर्णी यांची  सीएसइपीआय  राष्ट्रीय कार्यकारिणीत निवड
मराठवाड्यातील पहिले डॉक्टर म्हणून गौरव
समाजात लैंगिक आरोग्याविषयी जागरूकतेसाठी कार्यरत

बीड (प्रतिनिधी):- हैदराबाद येथे पार पडलेल्या सीएसइपीआय (सेक्सॉलॉजीस्ट डॉक्टरांची राष्ट्रीय परिषद) च्या वार्षिक सभेमध्ये बीडचे सुपुत्र डॉ. अनिकेत अनिलराव कुलकर्णी यांची राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली आहे.

हा मान मिळवणारे ते मराठवाड्यातील पहिलेच डॉक्टर ठरले असून, त्यांच्या या उल्लेखनीय निवडीमुळे संपूर्ण प्रदेशाचा अभिमान वाढला आहे. समाजात लैंगिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, संशोधनाला चालना देणे आणि नवीन उपचारपद्धतींविषयी मार्गदर्शन करणे या उद्देशाने  सीएसइपीआय कार्यरत आहे.

डॉ. अनिकेत कुलकर्णी यांच्या कार्याची दखल घेऊन मिळालेल्या या मानामुळे बीडसह संपूर्ण मराठवाडा गौरवान्वित झाला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून हार्दिक अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Jalna Express Media  के बारे में
For Feedback - softisky@gmail.com